भजन 1.
हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या?
रहेआजाद या जग में, हम दुनिया से यारी क्या?
जो बिछुडे है पियारे से, भटकते दर बदर फिरते,
हमन है इश्क मस्ताना......
हमारा यार है हममें , हमन को इंतजारी क्या?
न पल बिछुडे पिया हमसे, न हम बिछुडे पियारे से।
हमन है इश्के मस्ताना हमन को ..
उन्हीसे नेह लागा है, हमन को बेकरारी क्या?
कबीरा इश्क का माता दुई को दूर कर दिल से।
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या?
हमन है इश्क मस्ताना....
***** ***** ***** ***** ***** ****** *****
हमन है इश्क मस्ताना,
हमन को होशियारी क्या?
कबीर महाराजांचे हे भजन त्यांच्या नेहमी सारख्या तो
परमात्मा त्यांचा प्रियकर व ते त्यांची प्रेयसी असे आहे. त्यांच्यातील प्रेम कसे
आहे हे दर्शवीत आहे. आता ते म्हणतात की मला प्रेम झाले आहे, इश्क झाले आहे असे
नुसते नाही तर मी स्वतः प्रेम आहे, हमन म्हणजे ‘हम’ आम्ही, हम खुद ही इश्क हैं... मस्ताना
म्हणजे माझ्या प्रेमात मी मस्त आहे..
जेव्हा मला कोणाची तरी आस असते, प्रेम व्हावे वाटते,
त्याच्याशी संबंध बांधायचा आहे असे मनांत आहे तर हुशारी ने वागावे लागते, अलर्ट
राहावे लागते. निर्धास्त पणा नसतो, पण इथे कबीर महाराज म्हणतात, मीच स्वतः इश्क
झालो आहे मला होशियारी ची वगैरे गरज नाही. मी स्वतः परिपूर्ण आहे. मला असे प्रेम
आहे की मी त्याच मस्तीत आहे.
हमन को होशियारी क्या?
रहे आजाद या जग में
हमन् दुनिया से यारी क्या?
पुढे म्हणतात मी या जगात कसा का राहीना, मला कशाचेच काही नाही. मी या
जगात संसारी माणसा सारखा...जग में.. राहिलो काय किंवा आजाद, राहिलो
काय म्हणजे स्वतंत्र..कोणाचेच काही बंधन न बाळगता राहिलो काय, मला काही वेगळं
वाटतच नाहीए. मला जगातील लोकांशी देणं घेणं ते काय? साधारण पणे माणूस जेव्हा जगात
वावरतो तेव्हा एकमेकांविषयी प्रेम असतं, नाते संबंध असतात, नाही असे नाही. पण अनेकदा
व्यवहारात आपण हा विचार खूपदा करतो की आपल्याला गरज लागेल तेव्हा समोरचा कसा
वागेल, आपण नीटच वागूया, गरजेला कोण आहे आपल्याला? य भीतीने दोस्ती, किंवा व्यवहार
ठेवला जातो, याच्या संदर्भात ते म्हणतात की रहे आजाद या जग में हमें दुनियासे
यारी क्या?
जो बिछुडे है पियारे से
भटकते दर बदर फिरते, हमन है इश्क ....
जो आपल्या जिवलगा पासून दूर असतो त्याचे
वागणे, त्याची हुउरहुर सर्व वेगळ्याने जाणवते.कबीर महाराज म्हणतात जी लोकं
ईश्वरापासून दूर आहेत, म्हणजे असे समजतात की ईश्वर तर सर्व दूर आहे, पण आपण
आपल्याला त्याच्याहून वेगळं समजतो, या अवस्थेला ते म्हणतात... जो बिछुडे है
पियारे से .... ते सर्व भटकलेले आहेत,
त्यांना काही तरी उणीव भासते, सतत काही तरी हवे आहे, किंवा नको आहे. इथे जाऊ, तिथे
जाऊ असे वाट आहे. या अवस्थेला ते भटकते दर बदर फिरते असे म्हणत आहेत. पण ते स्वतः
ला परमात्म्याच्या प्रेमात, त्याच्या इश्क मधे ते स्वतः च इश्क होऊन गेलेत. ते
हमारा यार है हममें ,
हमन को इंतजारी क्या?
न पल बिछुडे पिया हमसे
न हम
बिछुडे पियारे से।
हमन है इश्के मस्ताना हमन को ..
ते म्हणतात माझा प्रियकर, यार ,
माझ्यातच आहे, म्हणून मला त्याची वाट बघायचीच नाही. कारण आपण वाट कोणाची बघतो? जो
किंवा जे, आपल्या जवळ नाही त्याची, म्हणजे आपल्याला त्याची आस असते, कारण त्याची उणीव
असते, आपल्याला ते हवे असते. म्हणून त्याची येण्याची आपण वाट बघतो. पण इथे
वस्तुस्थितीच निराळी आहे. कबीरमहाराज म्हणतात माझा जो यार आहे तो माझ्यातच आहे, मग
मी त्याची वाट कां बघावी? माझा ‘पिया’ तर एक क्षण देखिल माझ्याहून दूर नाही तसेच
मी त्याच्याहून अलग झालेला नाही....मी तर स्वतःच इश्क झालो अहे.
उन्हीसे नेह लागा है,
हमन को बेकरारी क्या?
ते म्हणतात की मला तर त्यांच्याशीच प्रेम लागले
आहे, आणि ते माझ्यातच आहेत तर मग हमन को बेकरारी क्या? बे करारी म्हणजे अस्वस्थ
पणा. करार नाही...जे आहे त्यात स्वस्थ पणा नाही. आपल्याजवळ आहे त्याला सोडून
काहीतरी अजून ची अपेक्षा, आस असणे, अस्वस्थ पणा, म्हणजे बेकरारी, चैन न पडणे.तर
त्यांची अवस्था ते सांगतात की मी एकदम स्वस्थ आहे. मला अजिबात बेकरारी नाही.
यापुढे कबीर महाराज म्हणतात ...
कबीरा
इश्क का माता
दुई को दूर कर दिल से।
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या?
कबीर तर प्रेमातच आहे, प्रेमच आहे, अन् हे सर्व कसे
शक्य आहे कारण त्यांनी दुई म्हणजे दोन पणा, द्वैत, मी अन तू, याला दूर केले आहे.
दोनपणा असला की ओझे असते. जे आहे ते एकच आहे, ही उमज दृढ झाली की मगच पुढचं आपल्या
मनावर असलेल ओझ, भार, जायला लागतो. मी अन् तू.... हे द्वैत आहे, जे आहे ते एकलं
एकच आहे ही उमज घडणे, या साठीच जी काय धडपड आहे ती आहे. साधना म्हणा, जे नाव
द्यायचे ते द्या, आहे येव्हढेच. पण हा जो मार्ग आहे, तो नाजुक आहे असे कबीर महाराज
म्हणतात. मार्ग मनाच्या शुद्धीचा आहे.सर्व काही ईश्वर आहे ही उमज घडे पर्यंत कुठे
तरी अडकतच राहणार. कारण आपण वावरत आहोंत, जगत आहोंत या द्वैत समज दृढ असलेल्या
संसारात. मग ती ‘एक’ ची समज सर्व प्रथम व्हायला लागते ,थिओरेटिकली...मग अनुभवात
आणि मग ती दृढ व्हायला लागते, व्हायला ह्वी. याची सुरुवात मनाच्या निर्मल करण्या पासून
आहे. त्या मनावरील जळमटांना, चांगल्या वाईट आग्रही संस्कारांना, जबरद्ती, वाटत
नसताना काहीतरी जनमानसात बरे दिसेल असे करण्याची परवडत् नसतानची सवय, स्वतःचा
आग्रही चंगुलपणा दाखवणे, रीत म्हणून बाळगलेल्या सवईंना, याला त्यांनी बोझ म्हटले
आहे. ते म्हणतात तुला चालायचे आहे आपल्याच पावलांनी, मग हा मार्ग कसा हे ते बघना आधी.
हा मार्ग नाजुक आहे, (वर सांगितल्या प्रमाणे) तर मनावर डोक्यावर ओझे कां घेऊन
चालतोस्? मन निर्मळ कां करीत नाहीस? मन
निर्मळ केलेस की ओझे कमी होईल.
कबीरा इश्क का माता
दुई को दूर कर दिल से।
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या?
हमन है इश्क मस्ताना....
No comments:
Post a Comment