नैहरवा हमका न भावै हमका न भावै...नैहरवा...
साई की नगरी परम अति सुंदर अति सुंदर,
जहाँ कोई जाय न आवै।
नैहरवा हमका न भावै हमका न भावै...नैहरवा...
चाँद सुरज जहाँ पवन न पानी,
को संदेश पहुँचावै, दर्द यह साँई को सुनावै..नैहरवा...
आगे चलो पंथ नहीं सूझै पीछे दोष लगावै,
केहि बिध ससुरे जाऊँ मोरी सजनी
बिरहा जोर जरावै, विषरस नाच नचावै...नैहरवा...
बिन सतगुरू आपणों नहीं कोई, जो यह राह बतावै,
कहत कबीर सुणो भाई साधो,
सुपणे न प्रीतम आवै, तपन यह जिय की बुझावै॥ नैहरवा...
कबीर
महाराज परमात्म्याला पति, प्रियतम किंवा कधी
तरी आई मानतात. ह्या भजनात ते प्रियतम म्हणून, पति म्हणून परमात्म्या विषयी बोलत आहेत.
नैहर ...म्हणजे माहेर, तसेच नैहरवा म्हणजे थोडे लाडीकपणे म्हटले जात आहे, की मला माहेर भावत नाहीए, हमका न भावै,आम्हाला इथे आवडत नाहीए. त्यांना आपल्या प्रियतमा कडे जाय चे आहे , न्यार्या रामा कडे जायचे आहे. या भजनात असे वाटत आहे की साधकाला परम तत्वाची झलक मिळाली आहे त्या न्यार्या रामाची, त्यांच्या प्रियतमाची, ओझरती का होईना झलक मिळाली आहे, पण पूर्णत्व नाहीए..म्हणून या भजनात साधकाची तगमग दिसत आहे, प्रियतमा कडे जायची तीव्र इच्छा असलेली प्रेयसी जणू आपल्या मनातील आस सांगत आहे. प्रियतमाकडे जायची खूप तळमळ लागली आहे या भावने ने ती सखीला सांगत आहे व तिची तगमग व्यक्त होत आहे. ती जशी म्हणेल तसेच या ठिकाणी कबीरमहाराज म्हणत आहेत.
साई की नगरी परम अति सुंदर अति सुंदर,
जहाँ कोई जाय न आवै।
कबीर महाराजांच्या साईंची जी नगरी आहे, जिथे तो परमात्मा असतो.. ती
नगरी अत्यंत सुंदर आहे, अगदी परम सुंदर आहे. तिथे कोणी गेलं की परत येत नाही.
आता इथे आपण अगोदर समजलेल्या गोष्टीची आठवण करूया.
आपल्याला माहीत आहे की परमात्मा सगळीकडे भरून उरला आहे. तो नाही असे एक ही ठिकाण नाही. त्यांनीच अनेक दोह्यांमधे, त्यांच्या भजनात ह्या अर्थाचं लिहिलं, सांगितल आहे...
मालिक बिन खाली नहीं, सूई धरन को ठौर।
तिथे जाणं म्हणजे नेमकं काय? मन पूर्णपणे निर्मल झालं की, मनावरील सगळी पुटं,
संस्कार, राग, लोभ मोह, इ. सर्व अंजन निघालं की (वस्तु आहे तिथेच आहे पण
आता) निर्मल मनाला .. वस्तूचं अस्तित्व उमजायला लागतं. अगदी स्पंदनाच्या ...manifestation च्या अगोदरची अवस्था असते तिथे
आणि तिथेच म्हणजे तीच साईंची नगरी असते.... म्हणजे तिथे जायला काही आपण आहोंत ते
ठिकाण सोडून जायचे असते असे नाही पण मनाच्या पल्याड, आपल्याच अंतर्मनांत अजून अजून
आंत जायचे कि ती परम अति सुंदर साईंची नगरी आहे तिथेच आहे. पण तिथे ‘मी’ जात नाही.
मी म्हणजे अहंकार, जाऊ शकत नाही. आणि एकदा का तिथे कोणी जाऊ शकलं कि
ती नगरी कबीर महाराजांना भावते.
चाँद सुरज जहाँ पवन न पानी,
को संदेश पहुँचावै, दर्द यह साँई को सुनावै..
तिथे चंद्र सूर्य पवन पाणी काहीच नाही . जी उत्पत्ती झाली आहे तिथे फक्त ब्रह्मन् च आहे,
उत्पत्ति झालीच नाहीए. (इडा पिंगला ...चंद्र सूर्य नाही ,पंच महा भुते नाहीत. आज्ञाचक्राच्या वरची गोष्ट
आहे.)
मग तिथे माझ्या प्रियतमाला निरोप तरी कोण पोहोचवणार? आणि मला ज्या ह्या विरह वेदना होताहेत त्या माझ्या वेदने बद्दल, दर्द बद्दल साईंला कोण सांगणार? मला तर इथे अजिबात भावत नाहीए.
आगे चलो पंथ नहीं सूझै पीछे दोष लगावै,
कबीर महाराज पुढे लिहितात की साधक म्हणतो की आहे तिथून
पुढे कसे जायचे, प्रियतमाला तर भेटायचेच आहे पण काय करू कसे करू हे मला सुचत नाहीए, (आता प्रियतमा ला भेटणं म्हणजे
मनावरचे सर्व संस्कारांची पकड जाऊन मोकळं होणं मन निर्मल होणं ही पहिली आवश्यकता
असते. हे आपण बघितलय.) माझा भूत काळ मला त्रास देतोय, माझ्या सगळ्या संस्कारा च्या
घट्ट पकडी मला मोकळं होऊ देत नाहीत, माझेच संस्कार मला दोष लावतात. त्या मुळे सगळं
सोडून पुढे कसं जाऊ हे उमजत नाहीए. आपण समजायला लागलं की मग emotion ची पकड थोडी कमी होताना जाणवते. पण
मनाच्या सवई इतक्या चिकट्ट असतात की नवीन उमज घडू देत नाही, हे असं कसं करतेय मी?
अश्या वेळी नवीन समजलेलं सटकून जातं अन् पुन्हा मागच्या संस्कारांच्या कह्यात
येऊन तसेच वागायला लागतो आपण. ह्या सगळ्यातून बाहेर पडायला, असं होण्याला खूप ऊर्जावान असायला लागतं. जर
ऊर्जा, प्राण शक्ति, कमी पडली तर पुढे जाता येत नाही.
(आपल्या
संतांनी तुकाराम महाराजांनी पण म्हटलय न,
रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग , अंतर्बाह्य जग आणि मन॥
आणि
आपुलाचि संवाद आपुलेशी. तसंच काहीसं म्हणायचय कबीरमहाराजांना.
पुढे कबीरमहाराज म्हणतात
केहि बिध ससुरे जाऊँ मोरी सजनी
बिरहा जोर जरावै, विषरस नाच नचावै...नैहरवा...
केही बिधि म्हणजे कश्या प्रकारे ... आता सासरी कशी काय जाऊ
असं ती प्रेयसी(कबीर साहेब) आपल्या सजनी म्हणजे... सखी, प्रिय मैत्रिणीला सांगत
आहे. कबीर साहेब म्हणतात की मला विरह यातना होत आहेत बिरहा जोर जरावै....
विरहाचा जोर इतका आहे की मी त्यात जळत आहे. आणि वरून विष रस नाच नचावै...
म्हणजे सर्व विषय..इंद्रिय आपल्या आपल्या मागण्या करीत आहेत...विषय रस धिंगाणा
घालत आहेत. अशी पंचाईत झाली आहे साधकाची... परम पित्याची ओढ तर इतकी अधिक आहे पण
.... सुचत नाहीए, आपल्याच मनाच्या संस्कारांमुळे पाउलं मागे ओढली जाताहेत...
बिन सतगुरू आपणों नहीं कोई, जो यह राह बतावै,
या अश्या अवस्थेत सत् गुरू सोडून आपलं असं कोणीच नाही, नसतं. अजून कोणी पण मार्ग
दाखवू शकत नाही म्हणून कबीर साहेब म्हणतात की सत् गुरू शिवाय आपलं कोणीही नाही जो
की आपल्याला या अशा बिकट परिस्थितीतून बाहेर पडायचा दाखवू शकेल.
कहत कबीर सुणो भाई साधो,
सुपणे न प्रीतम आवै, तपन यह जिय की बुझावै॥
कबीर
महाराज म्हणतात की आपल्या जीवाची ही जी तगमग आहे, हा जो ताप आहे तो शमवायला
स्वप्नात काही प्रीतम येत नाही. स्वप्नात प्रीतम येऊन खरं काहीच होत नाही. पण जर आपल्याला भेटायचं आहे आपल्या प्रियतमाला मग..... आपणच सासरी
जायाला हवय.
नैहरवा हमका न
भावै, हमका न भावै.