Saturday, 20 December 2025

 


उड जायेगा हंस अकेला

जग दर्शन का मेला, .

 

जैसे पात गिरे तरुवरसे,मिलना बहुत दुहेला   ।

ना जानू किधर गिरेगा, लग्या पवन का रेला ।

 

जब होवेगी उमर पूरी,जब छूटेगा हुकम हुजूरी;

जम के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला।

 

दास कबीर हर के गुण गावै,वा हर को पार न पावै;

गुरू की करनी गुरु जावैगा; चेले की करनी चेला:

 

उडजायेगा, हंस अकेला.



 

उड जायेगा हंस अकेला

जग दर्शन का मेला, .

कबीर महाराज या भजनात चेतावनी तर देतातच आहेत पण मुख्यत्वे करून वस्तुस्थिती सांगत आहेत. ते म्हणतात की उड जायेगा हंस अकेला....म्हणजे जेव्हा जीव/ प्राण / चैतन्य शरीराला सोडुन जातं तेव्हा ते एकटंच जातं, इथे जगात असतं तेव्हा त्या बरोबर हे पंच कोषात्मक शरीर असतं, मन बुद्धी अहंकार सगळं असतं पण जेव्हा मृत्यु येतो  तेव्हा  हे शरीर इथेच सोडून जायचं असतं. तो जीव ...हंस... मन बुद्धी अहंकार घेऊन निघून जातो. ते म्हणतात की जगात येऊन फक्त बघायचं काम करायचय.मन बुद्धी अहंकार हे सर्व वापरावे लागतात पण .. जग हे एक मेळ्या प्रमाणेच आहे. तिथे जाऊन आपण नवीन नवीन गोष्टी , सजावट, नव्या जुन्या प्रकारचे खेळ, जादूचे प्रयोग, इ. नुसतं बघतो, कधीतरी काही विकत घ्यावेसे वाटले तर विकत घेतो, आपली म्हणून घरी नेतो, त्या सगळ्यात आपण आपला जीव ओततो, पण यात काहीच अगदी आपल्याला असे काहीच मिळत नाही. पारमार्थिक दृष्टीने आपण रिकामेच राहातो. सगळं जिथल्या तिथेच राहाते. इथे, या जगात जे मिळवले ते इथेच सोडून जावे लागते. इथे फक्त बघणे होते, मनावर ज्या गोष्टी बिंबतात त्याचे तेव्हढेच  ठसे बरोबर जातात. म्हणून कबीर महाराज म्हणतात की  जग दर्शन का मेला....    

 

जैसे पात गिरे तरुवरसे,मिलना बहुत दुहेला  

ना जानू किधर गिरेगा, लग्या पवन का रेला ।

जैसे पात गिरे तरुवर से... म्हणजे झाडाचे पान पिकल्या वर वृक्षाच्या फांदीला सोडून देते आणि नंतर ते पान पुन्हा सापडायला खूप अशक्य असते, दुहेला म्हणजे अशक्य. मिलना बहुत दुहेला. ना जाने किधर गिरेगा... कोणास ठाऊक कुठे जाऊन पडेल कारण खूप वारा सुटला आहे. मृत्यु नंतर जसं पान झाडाला सोडून देतं तसंच जीव शरीराला सोडून देतं. आणि ते पुन्हा कुठे जाऊन जन्मास येईल हे काही आपल्याला माहीत नसतं. आपापल्या कर्मा प्रमाणे .... जिथे कुठे आपल्या कर्मांचा निचरा होणार असेल, त्या जन्मीचं allotted प्रारब्ध कर्म काय असेल त्या प्रमाणे, संस्कारां प्रमाणे, जीव पुन्हा जन्म घेईल. म्हणून ना जाने किधर गिरेगा... कारण पवन का रेला म्हणजे आपल्या कर्माची, संस्काराची आंधी (ईश्वराच्या इच्छेप्रमाणे) कुठे नेऊन सोडेल माहीत नाही. 



जब होवेगी उमर पूरी,जब छूटेगा हुकम हुजूरी;

जम के दूत बडे मजबूत, जम से पडा झमेला।

कबीर महाराज म्हणतात की जेव्हा आपली उमर पूरी होते म्हणजे या जन्मीचे आपले कर्म संपले, घेवाण देवाण संपली की आपली उमर पूरी होईल, जेव्हा हुजूर म्हणजे ईश्वर चा हुकुम होईल की चला आता, जब छूटेगा हुकुम हुजूरी  तेव्हाच आपण हा देह सोडू शकतो. आणि ते म्हणतात की तो न्यायला जर यमाचे दूत आलेत ... तर आपल्याला ते अगोदरच सांगत आहेत की जम के दूत, बड़े मजबूत ते जे यमदूत असतात ते खूपच मजबूत असतात म्हणजे तिथे काही कोणाचे चालत नाही, त्याचे सगळे मुकाट्याने ऐकावे लागते. खरे असे आहे की  यम हा धर्म असतो म्हणजे तिथे धर्माविना गोष्टच घडत नाही, कधी ही अन्यथा घडतच नाही... तिथे कोणाचे शिफारस किंवा बेशिस्त पणा चालत नाही. एकदा का पाप पुण्य किंवा कहीही ज्या गोष्टीचा कुणावर , आपल्यावर सुद्धा परिणाम होतो ते register होतं, आपल्या कोशांवर imprint होतं आणि त्याचा हिशोब द्यावाच लागतो, ते सुख अथवा दुःख जिथल्या तिथे भोगून संपवावं असं सांगितलं जातं..... परिणाम भोगावेच लागतात. भोगताना पुन्हा चिडचिड करून नवीन कर्म जमवले तर ते भोगावे लागतात. निष्काम कर्म ह्याच साठी सांगितलं जातं, किंवा केलेलं सगळं ईश्वरार्पण बुद्धीने करावं असे सांगतात.

 

दास कबीर हर के गुण गावै,वा हर को पार न पावै;

गुरू की करनी गुरु जावैगा; चेले की करनी चेला:

हरीचा दास कबीर आहे ते म्हणतात की मी तर त्या अनंत हरी चे गुण सतत गातोय तरी मला त्या हरीचा पारच नाही लागत. हरी जो की अनंत , अमर्याद, असीम असा आहे, तेच निरंजन आहे त्यालाच ते हरी म्हणत आहेत आणि त्या निरंजनाचा कधी कोणाला पार लागू शकतो का, नाहीच लागू शकत. त्याच्याच इच्छे प्रमाणे होत असतं.

किती ही मोठे गुरू असतील तरी त्यांच्या करणी प्रमाणे त्यांना मिळेल आणि शिष्याच्या करणी प्रमाणे शिष्याला मिळेल. तिथे कोणी कोणाला देऊ घेऊ शकत नाही.

गुरूवर शिष्याचा जितका भरवसा असेल त्या भरवश्या प्रमाणे शिष्याची अनेक पटीने आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. बाबाजींनी एक गोष्ट सांगितली होती ..... शिष्या ने एकदा  

२.. पत्थर को पूजोगे तो उसमे भी भगवान प्रगट होते हैं.. जो ज्या भावाने करेल त्या भावाला परम गुरू तत्वाकडून  उत्तर मिळतं. म्हणुन म्हणतात की गुरूकी करनी गुरुजायेगा...चेलेकी करनी चेला 

 

  कबीर महाराज म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला जे नाम, सुमिरन करायला शिकवले आहे ...तेच मला साधन दिलय, सत्त ला जाणायला शिकवले आहे, सत्त नामावर विश्वास ठेवाय चा म्हणजे काय करायचे ते माझ्या अंतरंगात उतरवले आहे. ... सांगितले आहे... हे जे माझे साधन आहे ते माझ्या अंतरंगात उतरवलं आहे किती हितकारी आहे हे मला उमजले आहे. जे साधन आहे त्याचा मी दास  बनून  आहे, ते  निरंतर चालू राहणार. 

 

 या भजनात कबीर महाराज म्हणत आहेत की जीव शरीराला सोडून निघून जाईल... बोलावणं आलं की जाणार,  म्हणून आता शरीरात जीव आहे तोवर जे करायचे ते करून घ्या, ईश्वर दर्शन्, मिलन घडवून घ्या. सत्गुरूला ओळखा, त्यांचे सबद ग्रहण करा, जिवंत पणीच जे करायचे ते करा...नंतर काही ही करता येणे शक्य नाही.

 

 

उडजायेगा, हंस अकेला.

Friday, 12 December 2025

 

भजन 1.

                 हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या?

 

                 रहेआजाद या जग में, हम दुनिया से यारी क्या?

                 जो बिछुडे है पियारे से, भटकते दर बदर फिरते,

                 हमन है इश्क मस्ताना......

 

               हमारा यार है हममें , हमन को इंतजारी क्या?

              न पल बिछुडे पिया हमसे, न हम बिछुडे पियारे से।

              हमन है इश्के मस्ताना हमन को ..

 

             उन्हीसे नेह लागा है, हमन को बेकरारी क्या?

             कबीरा इश्क का माता दुई को दूर कर दिल से।

            जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या?

            हमन है इश्क मस्ताना....


        *****       *****        *****      *****       *****        ******      *****      

                                

हमन है इश्क मस्ताना,

हमन को होशियारी क्या?

 

कबीर महाराजांचे हे भजन त्यांच्या नेहमी सारख्या तो परमात्मा त्यांचा प्रियकर व ते त्यांची प्रेयसी असे आहे. त्यांच्यातील प्रेम कसे आहे हे दर्शवीत आहे. आता ते म्हणतात की मला प्रेम झाले आहे, इश्क झाले आहे असे नुसते नाही तर मी स्वतः प्रेम आहे, हमन म्हणजे ‘हम’ आम्ही, हम खुद ही इश्क हैं... मस्ताना म्हणजे माझ्या प्रेमात मी मस्त आहे..

जेव्हा मला कोणाची तरी आस असते, प्रेम व्हावे वाटते, त्याच्याशी संबंध बांधायचा आहे असे मनांत आहे तर हुशारी ने वागावे लागते, अलर्ट राहावे लागते. निर्धास्त पणा नसतो, पण इथे कबीर महाराज म्हणतात, मीच स्वतः इश्क झालो आहे मला होशियारी ची वगैरे गरज नाही. मी स्वतः परिपूर्ण आहे. मला असे प्रेम आहे की मी त्याच मस्तीत आहे.    

 हमन है इश्क मस्ताना,

हमन को होशियारी क्या?

रहे आजाद या जग में

हमन् दुनिया से यारी क्या?

पुढे म्हणतात मी या जगात  कसा का राहीना, मला कशाचेच काही नाही. मी या जगात संसारी माणसा सारखा...जग में.. राहिलो काय किंवा आजाद, राहिलो काय म्हणजे स्वतंत्र..कोणाचेच काही बंधन न बाळगता राहिलो काय, मला काही वेगळं वाटतच नाहीए. मला जगातील लोकांशी देणं घेणं ते काय? साधारण पणे माणूस जेव्हा जगात वावरतो तेव्हा एकमेकांविषयी प्रेम असतं, नाते संबंध असतात, नाही असे नाही. पण अनेकदा व्यवहारात आपण हा विचार खूपदा करतो की आपल्याला गरज लागेल तेव्हा समोरचा कसा वागेल, आपण नीटच वागूया, गरजेला कोण आहे आपल्याला? य भीतीने दोस्ती, किंवा व्यवहार ठेवला जातो, याच्या संदर्भात ते म्हणतात की रहे आजाद या जग में हमें दुनियासे यारी क्या?

 

जो बिछुडे है पियारे से  

भटकते दर बदर फिरते, हमन है इश्क ....

जो आपल्या जिवलगा पासून दूर असतो त्याचे वागणे, त्याची हुउरहुर सर्व वेगळ्याने जाणवते.कबीर महाराज म्हणतात जी लोकं ईश्वरापासून दूर आहेत, म्हणजे असे समजतात की ईश्वर तर सर्व दूर आहे, पण आपण आपल्याला त्याच्याहून वेगळं समजतो, या अवस्थेला ते म्हणतात... जो बिछुडे है पियारे से  .... ते सर्व भटकलेले आहेत, त्यांना काही तरी उणीव भासते, सतत काही तरी हवे आहे, किंवा नको आहे. इथे जाऊ, तिथे जाऊ असे वाट आहे. या अवस्थेला ते भटकते दर बदर फिरते असे म्हणत आहेत. पण ते स्वतः ला परमात्म्याच्या प्रेमात, त्याच्या इश्क मधे ते स्वतः च इश्क होऊन गेलेत.    ते

 

हमारा यार है हममें ,

हमन को इंतजारी क्या?

न पल बिछुडे पिया हमसे

 न हम बिछुडे पियारे से।

            हमन है इश्के मस्ताना हमन को ..

ते म्हणतात माझा प्रियकर, यार , माझ्यातच आहे, म्हणून मला त्याची वाट बघायचीच नाही. कारण आपण वाट कोणाची बघतो? जो किंवा जे, आपल्या जवळ नाही त्याची, म्हणजे आपल्याला त्याची आस असते, कारण त्याची उणीव असते, आपल्याला ते हवे असते. म्हणून त्याची येण्याची आपण वाट बघतो. पण इथे वस्तुस्थितीच निराळी आहे. कबीरमहाराज म्हणतात माझा जो यार आहे तो माझ्यातच आहे, मग मी त्याची वाट कां बघावी? माझा ‘पिया’ तर एक क्षण देखिल माझ्याहून दूर नाही तसेच मी त्याच्याहून अलग झालेला नाही....मी तर स्वतःच इश्क झालो अहे.

उन्हीसे नेह लागा है,

हमन को बेकरारी क्या?

ते म्हणतात की मला तर त्यांच्याशीच प्रेम लागले आहे, आणि ते माझ्यातच आहेत तर मग हमन को बेकरारी क्या? बे करारी म्हणजे अस्वस्थ पणा. करार नाही...जे आहे त्यात स्वस्थ पणा नाही. आपल्याजवळ आहे त्याला सोडून काहीतरी अजून ची अपेक्षा, आस असणे, अस्वस्थ पणा, म्हणजे बेकरारी, चैन न पडणे.तर त्यांची अवस्था ते सांगतात की मी एकदम स्वस्थ आहे. मला अजिबात बेकरारी नाही. यापुढे कबीर महाराज म्हणतात ...

 कबीरा इश्क का माता

दुई को दूर कर दिल से।

जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या?

 

 कबीर तर प्रेमातच आहे, प्रेमच आहे, अन् हे सर्व कसे शक्य आहे कारण त्यांनी दुई म्हणजे दोन पणा, द्वैत, मी अन तू, याला दूर केले आहे. दोनपणा असला की ओझे असते. जे आहे ते एकच आहे, ही उमज दृढ झाली की मगच पुढचं आपल्या मनावर असलेल ओझ, भार, जायला लागतो. मी अन् तू.... हे द्वैत आहे, जे आहे ते एकलं एकच आहे ही उमज घडणे, या साठीच जी काय धडपड आहे ती आहे. साधना म्हणा, जे नाव द्यायचे ते द्या, आहे येव्हढेच. पण हा जो मार्ग आहे, तो नाजुक आहे असे कबीर महाराज म्हणतात. मार्ग मनाच्या शुद्धीचा आहे.सर्व काही ईश्वर आहे ही उमज घडे पर्यंत कुठे तरी अडकतच राहणार. कारण आपण वावरत आहोंत, जगत आहोंत या द्वैत समज दृढ असलेल्या संसारात. मग ती ‘एक’ ची समज सर्व प्रथम व्हायला लागते ,थिओरेटिकली...मग अनुभवात आणि मग ती दृढ व्हायला लागते, व्हायला ह्वी. याची सुरुवात मनाच्या निर्मल करण्या पासून आहे. त्या मनावरील जळमटांना, चांगल्या वाईट आग्रही संस्कारांना, जबरद्ती, वाटत नसताना काहीतरी जनमानसात बरे दिसेल असे करण्याची परवडत् नसतानची सवय, स्वतःचा आग्रही चंगुलपणा दाखवणे, रीत म्हणून बाळगलेल्या सवईंना, याला त्यांनी बोझ म्हटले आहे. ते म्हणतात तुला चालायचे आहे आपल्याच पावलांनी, मग हा मार्ग कसा हे ते बघना आधी. हा मार्ग नाजुक आहे, (वर सांगितल्या प्रमाणे) तर मनावर डोक्यावर ओझे कां घेऊन चालतोस्?  मन निर्मळ कां करीत नाहीस? मन निर्मळ केलेस की ओझे कमी होईल.    

 

 

कबीरा इश्क का माता

दुई को दूर कर दिल से।

जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या?

 

हमन सर बोझ भारी क्या?

हमन है इश्क मस्ताना....