Saturday, 22 November 2025

 कबीर महाराजांचे  भजन  


अब का डरौ, डर डर ही समानां ।

जब तैं मोर तोर पहिचानां ॥


जब लग मोर तोर करि लीन्हां, भै भै जनमि जनमि दुख दीन्हा ।

आगम निगम एक करि जानाँ , ते मनवाँ मन माँहि समाना ॥


जब लग ऊँच नीच करि जानाँ, ते पसुवा भूले भ्रम नाँना । 

कहे कबीर मैं मेरी खोई, तबहि राम अवर नहिं कोई ॥

**********


निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा, गाऊँगा ।


मूल कमल दल आसन बांधूजी 

उलटी पवन चढाऊँगा…निर्भय निर्गुण.


मन ममता को थिर कर लाऊजी, 

पांचो तत्त मिलाऊंगा … निर्भय निर्गुण. 


पांच पचीसो , पकड मंगावूजी 

एक ही डोर लगाऊंगा … निर्भय निर्गुण.


शून्य शिखर पर अनहद बाजे जी, 

राग छतीस सुनाऊँगा … निर्भय  निर्गुण.


कहत कबीरा सुनो भई साधोजी,

जीत निशन धुराऊँगा … निर्भय निर्गुण 


********


अब का डरौ, डर डर ही समानां ।

जब तैं मोर तोर पहिचानां ॥


जब लग मोर तोर करि लीन्हां, भै भै जनमि जनमि दुख दीन्हा ।

आगम निगम एक करि जानाँ , ते मनवाँ मन माँहि समाना ॥


जब लग ऊँच नीच करि जानाँ, ते पसुवा भूले भ्रम नाँना । 

कहे कबीर मैं मेरी खोई, तबहि राम अवर नहिं कोई ॥


1.

अब का डरौं डर डरहि समाँनां ।

जब तैं मोर तोर पहिचाँनां ॥ 

कबीर महाराज या भजनात साधकाला  भितीच्या भावनेतून कसे बाहेर यायचे, सुरवातीला  कशी अवस्था असते हळू हळू  कसे बदल घडत जातात, कां व कसे घडते याचे अत्यंत नेमक्या शब्दात वर्णन करत आहेत.

आता हे भजन समजायसाठी आपल्याला भिती या शब्दाचा सखोल अर्थ समजणे आवश्यक आहे.

एक गोष्ट आपल्या लक्षात येते की भिती नेहमीच आपल्याला  दुसर्‍या गोष्टीची म्हणजे आपल्याहून जे वेगळं आहे त्याचीच भिती वाटते.  म्हणून आपण                                                               

भिती केव्हा वाटते, कुणाची वाटते, कुणाला वाटते..हे सगळं अगोदर समजून घेऊया आपण. लहानपणी वाटणारी एक भिती असते...त्यानंतर काही वर्षांनी वेगळ्या गोष्टींची भिती वाटते, हे सगळं समजत उमजत पुढे जाता जाता लक्षात येतं कि आपण आपल्याहून जे वेगळं, म्हणजे शरीराहून दुसरं असतं त्या गोष्टीला भीतो. दुसर्‍याला भीतो. दोन असलं की भिती वाटते. अगदी झुरळ पाल उंदीरा पासून भूत प्रेत इ.पासून चोर चिलटापर्यंत कुणाचीही भिती वाटू शकते. अर्थात काही लोक असतात ज्यांना भिती वाटत नाही या असल्या गोष्टींची. कुणी म्हणतात की माणसाला मृत्युची भिती वाटते इ. पण मुळात भीती ही दुसर्‍याचीच असते . एकटं बसलेलं असताना सुद्धा माझी माझ्या विषयी जी कल्पना आहे त्या पेक्षा काहीतरी वेगळं भासलं, माझ्यातच जाणवलं, दिसलं , तरी  ते मला नको होतं, मग मी अस्वस्थ होते, चलू विचार सोडते अन दुसरं काही तरी विचार करते. विषय बदलते, जे चालू आहे ते नको होतं. खरं तर विषय बदलणं हे असलेल्या गोष्टीं पासून दूर पळण्याचे एक हमखास तंत्र आहे. पण याने भिती जात तर नाहीच पण उलट घट्ट होते.

 या भजनात कबीर महाराज आपली भीती कशी गेली / जाते, या बद्दल खूप नेमक्या शब्दात सांगत आहेत. ते म्हणतात की जेव्हा पासून मला मोर तोर म्हणजे माझं तुझं हे अडचण करतय हे लक्षात आलं,  ओळखू आलं तेव्हा पासून डर डरहि समाँनां म्हणजे भीति भीतीतच विरघळली. समाँना म्हणजे सामाऊन जाणेमग ते म्हणतात अब का डरौं?   आता भिण्याचं काय कारण? मोर तोर म्हणजेमाझं तुझं असं काहीच नाहीए. कारण तो एक परमात्माच नटून थटून बसलाय नं आसपास मग यात दोन् कुठे आहे कोणी? एकला तोच आहे न? हा मी, हा तू, किंवा हे माझं, हे तुझं, असं काही नाहीच आहे.

आता दोन जर नाही एकला एकच परमात्मन् आहे, ब्रह्मन आहे, एकलं एक तेच आहे, असे असताना भीती कशी काय वाटेल?   तेच त्यालाच कसे काय घाबरेल? 

दुसरं असं की जो पर्यंत मी त्या भीतीला सामोरी जात नाही,  म्हणजे हे सगळं मनाचं, माझ्या मनाचं चालू आहे हे उमजत नाही त्या अवस्थेतून वर उठत नाही..., त्याचं निरर्थकत्व उमजत नाही म्हणजे ही भीती म्हणजे मला जे वाटतय ते नुसतंच मनाचं आहे, खरं नाहीए, त्या सगळ्यातून वर उठलं जात नाही .... हे कळतं.... मग खरं उमजलं की वाटतं....की माझ्या सकट सगळाच तो एक रामच रमतोय तर...  अब का डरौ?  ाअता काय भ्यायचे? 

 

जब लग मोर तोर करि लीन्हां, भै भै जनमि जनमि दुख दीन्हा ।

ते म्हणतात की जो पर्यंत माझं तुझं होतं, मोर तोर होतं, हे माझं, हे तुझं, मग त्या पाठी हेवा दावा, तुझं चांगलं माझं नाही, त्या पाठी दुःख , सुख, लहान मोठं सगळंच आलं. मग लिभ मोह क्रोध असं सर्व येत गेलं. कारण काय तर  स्वतःला दुसयाहून निराळं समजलं गेलं. थोडक्यात कारण काय तर द्वैत भाव मनांत ठाण मांडून होता.  मग माझं मन तर निर्मल झालंच नाही अन् देह सोडायची घटिका आली. काम पूरण झालेच नाही या जन्मीचे. मग  मला सतत  सारखं सारखं जन्म घ्यावा लागत होता.. आणि दुःख भोगावं लागत होतं. कारण माझं तुझं ....    हे चांगलं ते वाईट, ह्याचा द्वेष, याच्याशी माया हे आपलं ते दुसर्‍याचं, इ.  इ. असे चालू रहाते. या सगळ्याने , म्हणजे माझं तुझं ...द्वैत भाव मनांत ठेवल्याने, सतत निवड प्रक्रिये ने, सुख दुःख होतं, हेवा दावा होतं, राग लोभ होतं....बंधनपर कर्म बनत जातं. मग ते भोगायला जन्म घ्यावा लागतो. मग पुन्हा दुःख...असे अविरत  चक्र चालू रहातं.

 

 

'निगम'  म्हणजे  - १. मार्ग। पथ। २. वेद।

निगमागम = निगम आगम = वेद-शास्त्र।

 

निगम :: शब्द, पद और श ब्दांचे मूळ रूप किंवा निरुक्ति। सामान्यतया निगम वेदांसाठी   प्रयुक्त मानतात.  वैदिक मतों का निरूपण, प्रतिपादन और स्पष्टीकरण शामिल है।

आगम ::

सामान्यतया आगम तंत्र विषयी सांगितले जाते. तन्त्र-शास्तराचे  एक नाव रूप आगम शास्त्र प्भण आहे.  

 

आगम निगम एक करि जानाँ, ते मनवाँ मन माँहि समाना ।

आगम .....तंत्र.

निगम......मार्ग, पथ, वेद.

जेव्हा हे लक्षात आलं की आगम आणि निगम दोन्ही एकच आहे तेव्हा मन आपला हेका सोडायला लागतो.  आपलं मन जे की संकल्प विकल्प करत  असतं  ते समष्टी मनांत समावून जातं.. विश्व मनांत सामावतं.. विस्तार पावतं. Larger perspective यायाला लागतं. फक्त स्वतःचा विचार नाही होत, समग्र चा विचार होतो. मग हे ठीक अन हे ठीक नाही असं काही उरत नाही. सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो.  

 

जब लग ऊँच नीच करि जानाँ,  ते पसुवा भूले भ्रँम नाँना ।

जो पर्यंत हे मोठं ते लहान असा भेद भाव असतो तो पर्यंत  माणूस पशूवत भ्रम बाळगून असतो व त्यातच भटकत असतो....भूले भ्रम नाना. पशू म्हणजे...हिसकावणे, ओढून घेणे, पटकन चांगलं, मोठं स्वतःला ओढून घेणं, आपण ओल्या शिवाय मिळणार नाही हा भाव, अहे त्याच्यात तृप्ती म्हणून नाहीच. निवांत पणा नाहीच. हे सर्व केंव्हा होतं १. मला दुसर्‍या पेक्षा कमी/ जास्त आहे असे वाटणे, दुसर्‍याचे ओढावेसे, हिसकावून घ्यावे असे वाटते, म्हणजे पशूगत वागणे होते. आणि याला कबीर महाराज भूले भ्रम नाना.. म्हणतात.   

 

कहे कबीर मैं मेरी खोई, तबहि राम अवर नहिं कोई॥

 

कबीर महाराज म्हणतात की जसंच मी आणि माझं खोई..म्हणजे माझ्यापासून दूर गेलं, lost it, तसंच जाणलं की जे आहे ते रामच आहे, अजून काहीच नाहीए. अवर नहीं कोई..  म्हणजे एक राम सोडून दुसरं काहीच नाही. ममत्व, अहंता गेली तेव्हा पासून रामाशिवाय दुसरं काहीच नाहीए.  मग अब का डरौ?


No comments:

Post a Comment